जळगाव, प्रतिनिधी | संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजनांसाठी जे पात्र लाभार्थी असतील व शासनाच्या योजनांपासून वंचीत असतील त्या सर्वांचे प्रस्ताव तयार करण्यासाठी व आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी ३ दिवसीय शिबिराचे आयोजन डॉ.कमलाकर पाटील यांच्या तर्फे दि.१९ ते दि.२० नोव्हेंम्बर दरम्यान करण्यात आले आहे. दरम्यान, आज २३ पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आले.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.२०, ००० चे अर्थसहाय्य शासनातर्फे देण्यात येते. तसेच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत प्रति महिना १००० रु चे अर्थसाहाय्य करण्यात येते. कानळदा भोकर गटातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तींचे जे कुटुंबीय राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असतील त्यांना लाभ मिळावा यासाठी तसेच कागदपत्रांसाठी जास्त फरफट होऊ नये यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव एकाच वेळी तहसील कार्यालयात सादर करण्याचा कार्यक्रम फुफनी येथील माजी सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांनी आयोजित केला होता. या वेळी सर्व पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्रे बारकाईने तपासून कार्यालयात सादर केले गेले.यावेळी एकूण २३ प्रस्ताव सादर करण्यात आलेत. तसेच अजूनही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजनांसाठी जे पात्र लाभार्थी असतील व शासनाच्या योजनांपासून वंचीत असतील त्या सर्वांचे प्रस्ताव तयार करण्यासाठी व आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी ३ दिवसीय शिबिराचे आयोजन डॉ.कमलाकर पाटील यांच्या तर्फे दि.१९ ते दि.२० नोव्हेंम्बर दरम्यान करण्यात आले आहे. तरी जे पात्र लाभार्थी अजूनही शासनाच्या या योजनांपासून वंचीत आहेत त्यांनी डॉ.कमलाकर पाटील यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.तहसील कार्यालय येथे प्रस्ताव सादर करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश सोनवणे,सचिन बनसोडे, संदिप पाटील सर, दादाराम सोनवणे व पात्र लाभार्थी महिला आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1718056235052048