जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे.
बुधवारी सकाळपासून अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांना घसा दुखण्याचा त्रास होत होता. त्यांनी तात्काळ खबरदारी म्हणून आरटीपीसीआर चाचणी साठी स्वाब दिले होते. दुपारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या छातीचा सिटीस्कॅन नॉर्मल असून आवश्यक ते उपचार अधिष्ठाता यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. काळजीचे कारण नाही, असे अधिकृत कळविण्यात आले आहे.