अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कै. र. सा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्ताचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शाळेतील चिमुकल्यांना दिंडी सोहळ्याचा आनंद लुटत आला.
प्राथमिक विद्या मंदीर शाळेत विविध जाती धर्मातील लोकांना वारकरी नावाच्या एका माळेत गुंफून विविध संतांच्या प्रबोधनाने, साहित्याने पावन झालेल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री विठ्ठल पांडुरंगास अभिवादन करण्यासाठी व आजच्या पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती आणि संतांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आषाढी एकादशी निमित्ताने भजन ,अभंग गायन ,पालखी मिरवणूक आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी सारखी वेशभूषा साकारलेले चिमुकले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल नामात सर्व दंग झालेले विद्यार्थी तुळस डोक्यावर धरून, नऊवारी साडी नेसलेल्या लहान विद्यार्थिनी, वारकरी वेशभूषाचे पांढरे कपडे परिधान करून गळ्यात टाळ आणि विना धारण करून चिमुकले विठू नामाचा गजर करत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालवाडीच्या मुख्याध्यापिका सुनंदा चौधरी, किर्ती बडगुजर, दीपा चौधरी, मनिषा पवार, संगीता जाधव यांनी परिश्रम घेतले.