पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील बिल्दी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे वाॅल कंम्पाउंडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चौकशीच्या मागणीसाठी माजी सरपंच एकनाथ पाटील यांनी गुरुवारपासुन तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
अनेक वेळा तक्रारी देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसावे लागले असे एकनाथ पाटील यांनी सांगितले .
हे वाॅल कंम्पाउंटचे बांधकाम एका महिला सदस्याच्या भावाने घेतले आहे. कामाविषयी माहिती विचारण्यासाठी एकनाथ पाटील गेले असता त्यांना मक्तेदार भागवत पाटील, कल्पना पाटील यांनी घरी घेऊन शिवीगाळ केली होती. याबाबत एकनाथ पाटील यांनी ४ मेरोजी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा काही उपयोग न झाल्याने पोलिस अधीक्षक यांचेकडे लेखी म्हणणे मांडले होते. २२ जुनरोजी उपविभागीय अधिकारी यांचेकडुन चौकशी सुरू असतांनाच सरपंच व ग्रामसेवकाने ४ लाख रुपयांचा धनादेश काढलेला आहे. या निकृष्ट बांधकामाची चौकशी होत नसल्याने माजी सरपंच एकनाथ पाटील यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.