रावेर, प्रतिनिधी | संवेदनशिल रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना शहरातर्फे रावेर शांती दूत”पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
रावेर येथील अंबिका व्यायाम शाळा बहुद्देशिय मंडळ तसेच सर्व धर्मीय सेवा समितीतर्फे रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांना ‘शांतीदूत’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्री. वाकोडे यांनी रावेर येथे जबाबदारी स्वीकारल्यापासून रावेर शहर तसेच रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. तसेच गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून नाव लौवकीस झाले असून शहर व हद्दीतील गणपती उत्सव, देवी उत्सव तसेच इतर उत्सव , यात्रा तसेच अपघात, महापूर, जातीय तनाव अशाबाबी कौशल्याने हाताळले आहेत. त्यांनी रावेर शहरातील हिंदू , मुस्लीम , बौध्द आणि आदिवासी यांचा एकोपा घडवू आणून रावेर शहरात शांततेचे वातावरण निर्माण केली. पोलीसांचा वचक व कायद्याची भिती असे त्यांच्या कर्तुत्वातून जनतेचे मनात भावना निर्माण केली. तसेच येणा-या तक्रारदार श्रीमंत असो किंवा गरिब यांना आपण न्याय मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. याचीच रावेरवासीयांचे मनात शांतीदूत म्हणून भावना निर्माण केली आहे. म्हणून सर्व धर्मीय रावेर वासीयांनतर्फे ” रावेर शांतीदूत ” हा पुरस्कार देण्यात आला आहे.