जळगाव प्रतिनिधी । ड्राय डे असतांना बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर शहर पोलीसांनी कारवाई करत १ हजार १७० रूपये किंमतीची दारू हस्तगत करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, ‘ड्राय डे’ असताना सुध्दा जुने बस स्थानक परिसरात विनोद अशोक बोरसे (२७, रा. आंबेडकरनगर) हा देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलिसांनी गुरूवारी दुपारी मिळाली होती. माहितीची खात्री होताच दुपारी १२.३० वाजता पोलिसांच्या पथकाने जुन बसस्थापन परिसरात सुरू असलेल्या दारू अड्डयावर छापा मारला. त्याठिकाणी विनोद हा देशी दारू विक्री करताना पोलिसांना मिळून आला. त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळील सुमारे १ हजार १७० रूपयांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे.
शहर पोलीस ठाण्यात विनोद बोरसे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरिक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, रतन गीते, दीपक सोनवणे, तेजस मराठे आदींनी केली आहे.