शहरातील शाळा, स्विमींग पूल, सिनेमागृह ३१ पर्यंत बंद

 

 

जळगाव, प्रतिनिधी । कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वीमिंग पूल, नाट्य गृह, सिनेमा गृह, व्यायाम शाळा दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपाचे उपायुक्त अजित मुठे यांनी दिले आहे.

राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्था पनेवरील शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या अनुषंगाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील सर्व मनपा शाळा, खाजगी शाळा, स्विमींग पूल, नाट्यगृह, सिनेमागृह, व्यायाम शाळा, म्युझीअम दि.३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिले आहे.  तसेच शहरातील हॉटेल व्यवसायीकांनी आपल्याकडे बाहेेरुन आलेल्या प्रवाश्यांची माहिती मनपाच्या वैद्यकीय विभागाला द्यावी व प्रवाश्यांपैकी कोणाला सर्दी खोकला येत असेल तर, तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी राम रावलाणी यांनी केले आहे.

Protected Content