शहरातील दुकानांमध्ये सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष ; महापालिका उपायुक्तांची कारवाई (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात मागील आठवड्यापासून व्यापारी संकुलातील दुकानदारांना ठरवून दिलेल्या नियमांनुसार दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र असे असतांन दुकानदारांकडून सर्रासपणे सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेच्या पथकाने शहरातील अनेक दुकानांवर कारवाई केली असून दुकाने सिल करण्यात आले आहे.

जिल्ह्यासह शहरही कोरोना प्रादुभावाच्या वाढत्या आकडेवारीने राज्यात बदनाम होत असताना मोकळीकीचा गैरफायदा घेण्याची सर्वांची मानसिकता असल्याने बाजारात सुरक्षित अंतराच्या बंधनाकडे सर्रास सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. दुकानांमधील ग्राहकाची गर्दी दुकानदारांनी सांगितले तरी जुमानायला तयार नाही, असेही अनुभव येत आहेत.

या पार्शवभूमीवर महापालिका उपायुक्त संतोष वाघुले यांनी बाजारात फिरून लोकांना आणि दुकानदारांना शिस्त लागावी म्हणून तंबी दिली. काही दुकानदारांवर दंड आकारण्याची कारवाईही त्यांनी केली. सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरु असावीत असा नियम प्रशासनाने लागू केलेला असला तरीही ग्राहकांच्या गर्दीमुळे बरीच दुकाने या वेळेनंतरही चालू राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने प्रशासन नियमांची चौकट आणखी कडक करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे

ही कारवाई करताना जे दुकानदार वेळेचे आणि अन्य नियमांचे बंधन पळत आहेत त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कारही उपायुक्तांनी केला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2183078251836571/

Protected Content