जळगाव प्रतिनिधी । शहरातील एसएसबीटी महाविद्यालयातील खेळाडूंनी स्मार्ट इंडिया हॅक थॉन स्पर्धेत पारितोषिक पटकाविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया तसेच स्टार्ट अप इंडिया सारख्या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी यंदाही स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात एसएसीबीटी महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारत पारितोषिक पटकाविले आहे.
स्मार्ट इंडिया हॅकथॉन या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ७ हजार ५०० संघांमधून निवड झालेल्या १२०० संघामध्ये जळगाव येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन संघाचा समावेश होता. त्यापैकी एका संघाची के.एल.विद्यापीठ विजयवाडा येथे व दुसऱ्या संघाची जयपूर येथे अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. प्रथम संघात संघ प्रमुख तेजस पिंगळकर, मोहित चौधरी, सागर पाटील, दीपेश चौधरी, कृतिका सटांगे व टीना पवार या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना प्रा. संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी भारत सरकार, केंद्रीय जल आयोग, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण, जल शक्ति मंत्रालयसाठी सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याचे सादरीकरण केले़ दुसºया संघामध्ये संघ प्रमुख यशश्री महाजन, आदित्य नाथानी, समक्ष वाणी, चेतन बडगुजर, खुशबू बजाज व गोपाल अग्रवाल यांचा समावेश होता. त्यांना प्रा. डॉ. मनोज पाटील, प्रा.योगेश्वरी बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
संगणक अभियांत्रिकी विभागातील प्रा. दिनेश पुरी व प्रा. सतपाल राजपूत यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ़ के. एस.वाणी, उपप्राचार्य प्रा.डॉ.संजय शेखावत व संगणक विभागप्रमुख प्रा.डॉ.जी.के.पटनाईक, महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.