Home धर्म-समाज शहरातील अनधिकृत बॅनर काढा अन्यथा रविवारपासून कडक कारवाई

शहरातील अनधिकृत बॅनर काढा अन्यथा रविवारपासून कडक कारवाई

0
41

फैजपूर, प्रतिनिधी | शहरात लागलेले अनधिकृत पोस्टर, बॅनर विरुद्ध पोलीस व पालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे. यात जे शनिवारपर्यंत अनधिकृत पोस्टर, बॅनर काढणार नाहीत त्यांच्यावर रविवारपासून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली.

 

शुक्रवारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच  जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी यांची ऑनलाईन बैठक होऊन त्यामध्ये अनधिकृत बॅनर विषयीचर्चा झाली. या चर्चेत जिल्ह्यातील सर्व शहरात असलेले अनधिकृत बॅनर दि.२  पर्यंत संबंधितांनी काढून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही शहरात बॅनर दिसल्यास रविवारपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करत कडक कारवाई केली जाणार आहे असेही श्री. अखेगावकर यांनी सांगितले.

 


Protected Content

Play sound