जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर तर्फे शरदचंद्र पवार साहेब सहस्त्रचंद्र दर्शन सप्ताहाचा दुसरा दिवस रक्तदान व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त १२ ते १९ डिसेंबर दरम्यान शरदचंद्रजी पवार साहेब सहस्रचंद्र दर्शन सप्ताहचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सप्ताहाच्या दुसच्या दिवशी दि. १३ डिसेंबर रोजी संत मुक्ताबाई प्राथमिक शाळा येथिल विद्यार्थ्यांना सुशील शिंदे यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब अॅड. रवींद्र पाटिल व महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान करून पवार साहेबांचा ८१ वा वाढदिवस जल्लोषात व उत्साहात साजरा केला. गरजू व गोरगरीब व्यक्तींना रक्ताची आवश्यकता असल्यास त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस जळगाव महानगरच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँगेस जळगाव महानगर तर्फे करण्यात आलेले आहे. या. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , महिला आघाडी महानगरअध्यक्ष मंगला पाटील , सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन सर , जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , माजी नगरसेवक सुनील माळी , विनोद देशमुख , दिलीप माहेश्वरी , माजी नगरसेवक राजू मोरे , माजी नगरसेवक डॉ. रिजवान खाटीक , अमोल कोल्हे , रमेश बाऱ्हे , सुशील शिंदे , किरण राजपूत , जितेंद्र बागरे , मुविकोराज कोल्हे , नईम खाटिक, रहीम तडवी, विशाल देशमुख , राहुल टोके , अकिल पटेल , राजू बाविस्कर , नामदेव पाटील , किरण , अमोल सोनार, विक्की फुगे, अक्षय सांगळे , योगेश नाईक , गणेश शिरसाठ, मेहरुण फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते , अयोध्या नगर , रामेश्वर कॉलनी , ईश्वर कॉलनी , घरकुल पिंप्राळा , मास्टर कॉलनी , तांबापूर येथील कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणावर रक्तदान झाल्याने रेड प्लस ब्लड बँक तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1012710132646386