शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : वृत्तसंस्था । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून “शरद पवार ग्रामसमृध्दी योजना” राज्य योजना म्हणून राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे

बँकांशी संबंधित दस्तावरील मुद्रांक शुल्काच्या दरामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय.या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा २०१८-१९ चा वार्षिक अहवाल विधानमंडळाच्या पटलावर ठेवण्याबाबत मान्यता देण्यात आली महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी तयार केलेल्या विधेयकांचा मसुदा ( शक्ती कायदा ) विधिमंडळात सादर करण्यास मान्यता. देण्यात आली

राज्याच्या अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली . राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या “आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र, २०२०” च्या विधेयकास आणि “डी.वाय.पाटील अँग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे, कोल्हापूर ” या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली .

Protected Content