शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानात ४ कर्मचारी कोरोनाबाधित

 

पुणे,  वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानापाठोपाठ बारामती येथील निवासस्थानातही करोनाचा शिरकाव झाला आहे. बारामतीतील पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानातील चार कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मुंबईत सिल्व्हर ओक येथे करोनाचे १६ रुग्ण आढळल्यानंतर शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानातील ५० कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ४ जणांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

करोनाची लागण झालेले चारही कर्मचारी पवारांच्या शेतात आणि बागेत काम करणारी आहेत. त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे. बारामतीत आतापर्यंत ४७३ करोना रुग्ण सापडले आहेत.

Protected Content