मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून महाबळेश्वरला जाण्यासाठीची परवानगी पत्र मिळणे अशक्य असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले आहे. शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून महाबळेश्वरला जाण्यासाठीचं परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचे सांगितले आहे. शरद पवारांचा या सर्व प्रकरणामध्ये हात असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार याबाबत प्रत्युत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे घरगुती संबंध असल्याचे जगजाहीर आहे, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.