अहमदनगरः वृत्तसंस्था । शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा अभास झालेल्या रोहित पवारांनी त्यांच्या खांद्यावरून खाली मतदारसंघात उतरावे, असा खोचक सल्ला भाजप नेते गोपचंद पडळकर यांनी रोहित पवारांना दिला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतरखराब रस्त्यावर उभा राहून व्हीडिओ बनवला, व तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘ रोहित पवार रोज हे ट्विटरवर मोदी, देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही, पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात. असा जहरी टीका पडळकर यांनी केली आहे.
‘रोहित पवार तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात, हे तुम्हाला कळेल. मिरजगाव मधील साधा रस्ता तुम्हाला करता येत नसेल, आणि देशाच्या नेतृत्वांना तुम्ही सल्ले देत असाल, तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे रस्ते दुरुस्त करा. मग बाकीच्यांना सल्ले द्यावेत, एवढीच विनंती करतो,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.