जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी हातमजूराची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, न्यामत खान चाँद खान (वय-४२) रा. कादर फौजदार बिल्डिंगच्या मागे शनीपेठ हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच १९ बीआर ३९५५) पार्किंगला लावली होती. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही मिळून न आल्याने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. न्यामत खान यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.