जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , न.पा. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. २७ ऑगस्ट रोजी पक्षाच्या जिल्हा कार्यलयात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , न.पा. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करून आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी माजी विधासभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे , प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश अण्णा पाटील , वसंतराव मोरे काका, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, प्रदेशसरचिटणीस राजीव देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी, सर्व फ्रँटल चे प्रमुख, जि.प. सदस्य , नगरसेवक, प.स सदस्य, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व इतर सर्व कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, आकाशवाणी चौक जळगाव. येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील , महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व सर्व फ्रँटल प्रमुखांनी केले आहे.