सिडनी: वृत्तसंस्था । यंदाही अमेरिका जगातील सगळ्यात पॉवरफूल देश असून पहिल्या स्थानी आहे. भारताच्या स्थानात दोन अंकानी घसरण झाली आहे. मागील वर्षी भारताचा समावेश या यादीत होता. मात्र, कोरोना संसर्गाचा भारताला फटका बसला असल्याचे बोलले जात आहे.
सिडनी येथील लोवी इन्स्टिट्यूटच्या एशिया पॉवर इंडेक्स २०२० नुसार २०१९ मध्ये भारताचा पॉवर स्कोअर ४१.० होता. यावर्षी या गुणात घट झाली असून ३९.७ टक्के इतके झाले आहे. या यादीत ज्या देशांचा पॉवर स्कोअर ४० हून अधिक आहे. त्या देशांचा समावेश सर्वाधिक शक्तिशाली देशांमध्ये होतो. त्यामुळे मागील वर्षी भारताचा समावेश या यादीत होता.
लोवी इन्स्टिट्यूटने सांगितले की, आशियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश या यादीतून बाहेर गेला आहे. भारताचा समावेश आता मध्यम शक्तिशाली देशांच्या यादीत करण्यात आला आहे. काही वर्षात भारताचा या यादीत पुन्हा समावेश होऊ शकतो. इंडो-पॅसिफिक भागातील देशांमध्ये भारताने कोरोनामुळे विकास क्षमता गमावली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास एकसारखी आहे. काही वर्षानंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकतो. भारतात संसर्गामुळे दोन्ही देशांदरम्यानची असमानता वाढली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत भारत चीनच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या केवळ ४० टक्केच पोहचू शकतो. २०१९ आधी ही शक्यता ५० टक्के इतकी वर्तवण्यात आली होती.
, भारताचा कूटनीतिक प्रभाव वाढला आहे. या भागात मोठी भूमिका बजावण्याची भारताची महत्त्वकांक्षा स्पष्ट होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. भारताने राजनयिक प्रभावात दक्षिण कोरिया आणि रशियाला मागे टाकले आहे.
ऑस्ट्रेलियाचे लोवी इन्स्टिट्यूट दर वर्षी जगातील प्रमुख देशांची आर्थिक क्षमता, सैन्य क्षमता, देशांतर्गत परिस्थिती, भविष्याचे नियोजन, जगातील इतर देशांसोबत असलेले संबंध, राजकीय व कूटनितीक प्रभाव आदी मुद्यांचा विचार करून शक्तिशाली देशाची यादी जाहीर करतात.