पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । धार्मिक भावना दुखावेल व दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हाटसअॅप ग्रुपमध्ये शेअर केल्यावरून पहूर येथे दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर, सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टवरून पोलीस खाते सतर्क झाले असून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशाच प्रकारचा एक गुन्हा येथे घडला आहे. पहूर येथील शाकीर शेखर कार बाजार ग्रुप या नावाने कार्यरत असणार्या व्हाटसअॅप ग्रुपमध्ये एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आली होती. शोएब शेख याने ही पोस्ट शेअर केली होती. तर या ग्रुपचा अॅडमीन शाकीर सलीम शेख आहे. या संदर्भात ग्रुपवरील क्लिपची माहिती फिर्यादीला मिळाली. यानुसार पहूर पोलीस स्थानकात या दोघांविरूध्द भादंवि कलम १८८ व ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००