व्यापारी गाळे, निवासी इमारतीच्या बेसमेंटचा अनधिकृत वापर टाळा – उपमहापौरांचे आवाहन (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील २९ पैकी २७ इमारतीमधील बेसमेंटचा वापर अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांनी आगामी काळात अनधिकृत बेसमेंट वापराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, त्यानुशंगाने नागरिकांनी व्यापारी गाळे, निवासी इमारतीच्या बेसमेंटचा होत असलेला अनधिकृत वापर टाळा असे आवाहन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले आहे.

 

शहरात विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालेली आहेत व करण्यात येत आहेत. यासंदर्भात नगररचना विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारीनुसार महासभेतदेखील यावर चर्चा झाल्या आहेत. शहरातील विविध भागात मंजुर नकाशा व्यतिरिक्त वाढीव स्वरुपाची अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याच्या तक्रारीनुसार रचना सहाय्यक यांच्याव्दारे विविध ठिकाणी सर्वेक्षणादरम्यान अनधिकृत बांधकामे, मार्जिनल स्पेसेसमधील विस्तारीत कामे, पार्किंगच्या जागांतील अनधिकृत व्यावसायिक वापर तसेच अनेक रहिवासी इमारती, व्यापारी संकुले यातील बेसमेंटचा अनधिकृत वापर केला जात इत्यादी बाबी आढळुन आलेल्या आहेत. त्यासंबधी सुमारे २-३ वर्षापुर्वी देखील अनधिकृत बांधकामधारकांना अनधिकृत बांधकामबाबत नोटीस देखील देण्यात आल्या आहेत. परंतु नगररचना विभागाकडुन कारवाईबाबत चालढकल केली जात असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई न करण्यामागे सहाय्यक संचालक नगररचना, कर्मचारी आणि आयुक्त यांचे संगनमत दिसुन येत आहे. शहरातील २९ बांधकामापैकी २७ इमारती बांधकामे बेसमेंटचा वापर अनधिकृत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व्हेक्षणात आढळुन आलेल्या अनधिकृत बांधकाम आणि वापर यांबाबत त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्य नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात येईल असा स्पष्ट इशारा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3178597642362542

 

Protected Content