जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी येथील माहेर तर रामेश्वर कॉलनीतील सासर आलेल्या विवाहितेचा व्यवसायासाठी १ लाख रूपायांसाठी शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह तीन जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कविता किरण पाटील (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी ह.मु. सुप्रिम कॉलनी जळगाव यांचा विवाह शहरातीलच रामेश्वर कॉलनी येथील किरण ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी झालेला आहे. सुरूवातीचे काही दिवस आनंदाने गेले होते. त्यानंतर त्यानंतर पती किरण पाटील यांनी मालवाहतूकीच्या व्यवसायासाठी पत्नी कविताला माहेरहून १ लाख रूपये आणायला सांगितले. तसेच लग्नात कोणताही मानपान केला नाही म्हणून मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. हा प्रकार घडविण्यासाठी सासरे ज्ञानेश्वर यशवंत पाटील आणि सासु संगिता ज्ञानेश्वर पाटील यांनी देखील पाठबळ दिले. सासू व सासरे यांनी देखील टोमणे मारूण शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.