व्यवसायासाठी दिलेला पर्याय मान्य नसल्याने हॉकर्स महापालिकेत दाखल (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेने फुले व सेन्ट्रल फुले मार्केटच्या फुटपाथवरील हॉकेर्स बांधवांना जुन्या साने गुरुजी रुग्णालयाचा पर्याय दिला असून या ऐवजी दुसरा पर्याय देण्यात यावा अशी मागणी करत आज हॉकर्स महापालिका प्रशाकीय इमारतीच्या प्रांगणात एकत्र आले आहेत.

हॉकर्स बांधवानी ते फुले व सेन्ट्रल फुले मार्केटच्या आतील बाजूस फुटपाथवर मागील अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. त्यांना नवीन जागेत स्थलांतर केल्यास त्यांच्या व्यवसायावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्थलांतर करावयाचे असल्यास फुले मार्केट समोरील पार्किंगच्या जागेवर करण्यात यावे अशी मागणी फुले व सेन्ट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियनतर्फे करण्यात आली आहे. या जागेवर स्थलांतर केल्यास फुले मार्केट मधील दुकानदारांप्रमाणे प्रती स्क़ेअरफुट प्रमाणे भाडे देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर स्थलांतर केल्यास संपूर्ण हॉकर्स तेथे बसू शकणार नसल्याने आहे त्या जागेवरच किंवा फुले मार्केट समोरील पार्किंगच्या जागेवर पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी युनियनचे अध्यक्ष नंदू पाटील(महाजन) यांनी केली आहे. याप्रसंगी सचिव सचिन जोशी, ज्ञानेश्वर शिवदे, इरफान शेख जाफर, मनोज चौधरी, बापू चौधरी, वसंत गवळी, रवी चौधरी, अमर शेख वजीर, परवीन जोशी, पप्पू ठाकूर आदी उपस्थित आहेत.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/461471081549811

 

Protected Content