Home आरोग्य वैद्यकीय महाविद्यालयात डीनच्या खुर्चीवर फिजिओलॉजी विभागप्रमुखांचा ठिय्या

वैद्यकीय महाविद्यालयात डीनच्या खुर्चीवर फिजिओलॉजी विभागप्रमुखांचा ठिय्या

0
30

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना त्यांच्या कॅबिनमध्ये फिजीओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.चंद्रकांत डांगे यांनी मद्यधुंद अवस्थेत येवून शिवीगाळ व दमदाटी करून गोंधळ घातल्याचा प्रकार आज सकाळी घडला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओलॉजी विभागाचे प्रमुख असलेले डॉ.चंद्रशेखर डांगे सोमवारी सकाळी १०.३० वाजता अधिष्ठाता यांच्या केबिनमध्ये आले. येथे त्यांनी थेट डीन यांच्या खुर्चीवर बसून मोबाईलवर गाणे ऐकू लागले. याबाबत अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी विचारणा केली असता त्यांनी आपण डीन असल्याचे ठासून सांगितले. खरं तर डॉ. भास्करराव खैरे यांची बदली झाल्यानंतर डॉ. मारूती पोटे यांच्याकडे या पदाचा तात्पुरता कार्यभार आहे. तथापि, डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी आपणच डीन असल्याचा आव आणल्याचे खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याआधी डॉ. डांगे यांनी मद्यधुंद अवस्थेत बॅरीकेडस तोडल्याने त्यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाठोपाठ आता डीनच्या खुर्चीवर बसून तमाशा केल्याने ते पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.


Protected Content

Play sound