वेल्हाळे उपकेंद्राला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

0
47


भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वेल्हाळे येथील ग्रामस्थांनी वीज उपकेंद्राला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला.

याबाबत माहिती अशी की, वेल्हाळे येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या ग्रामसभेत वीज वितरण कंपनीकडे असलेल्या थकबाकीवर वादळी चर्चा झाली. वारंवार मागणी करूनही वीज कंपनी ग्रामपंचायतीच्या थकीत कराचा भरणा करत नसल्याने ग्रामस्थांनी सबस्टेशन गाठून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. सरपंच सीमा पाटील, ग्रामसेविका अर्चना गजरे, पुरूषोत्तम पाटील, महेश महाजन, दिनेश पाटील, विजय पाटील, आकाश कुरकुरे, पोलिस पाटील संजय पाटील आदींनी सबस्टेशनला कुलूप लावून ग्रामपंचायतीचे सिल मारले. यानंतर पोलिस ठाण्यातील बैठकीत यावर सामोपचाराची भूमिका घेण्यात आली. परिणामी सील उघडल्यावर वीजपुरवठा सुरळीत झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here