Home क्राईम वेले येथून एकाची दुचाकी लांबविली

वेले येथून एकाची दुचाकी लांबविली

0
109


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वेले येथे वेल्डिंग दुकानदाराची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनमचंद गुलाबचंद बडगुजर (वय-५५) रा. अरुण नगर, ता. चोपडा हे वेल्गिकचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे तालुक्यातील वेले येथे वेल्डिंगचे दुकान आहे. दुकानावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एबी ४२०९) आहे. नेहमीप्रमाणे ११ ऑगस्ट रोजी पुनमचंद बडगुजर हे कामावर दुचाकीने गेले. त्यांनी दुचाकी त्यांच्या दुकानासमोर पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली, त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही आढळून आली नाही. चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप करीत आहे.


Protected Content

Play sound