Home Cities जळगाव वृक्षारोपण करून वरूण सरदेसाई यांचा निषेध ! (व्हिडिओ)

वृक्षारोपण करून वरूण सरदेसाई यांचा निषेध ! (व्हिडिओ)

0
31


जळगाव : प्रतिनिधी । दोन दिवसांपूर्वी युवा सेनेच्या मेळाव्यानिमित्त शहरातील मेहरूण भागात आलेले वरूण सरदेसाई यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी काही झाडे तोडण्यात आली होती. आज त्याच जागेवर वृक्षारोपण करून भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सरदेसाई यांचा निषेध केला. 

 

या वृक्षारोपणानंतर माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की , आम्ही राज्यभर फिरतो तेंव्हा आवर्जून वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी शक्य असेल तसे वृक्षारोपण करतो. आज मला  येथे आल्यावर  झाडांची कत्तल आणि त्या कत्तलीच्या कारणाबद्दल समजले त्यामुळे निषेध म्हणून आम्ही  हे वृक्षारोपण केले. राज्याचे पर्यावरणमंत्री व युवराज आदित्य ठाकरे  यांचे सहकारीच असे वागत असतील तर कुणाला काय बोलणार ? सरदेसाई यांची वाहने उभी राहण्यासाठी व त्यांच्या कार्यक्रमाचा मंडप टाकण्यासाठी अशी झाडे तोडून त्यांनी काय सिद्ध केले ? आम्ही आज वरूण सरदेसाई यांचा जाहीर निषेध करतो , असेही ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महानगर दिपक सूर्यवंशी,  मनपा स्थायी  समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, प्रदेश महिला संयोजिका डॉ. उज्वला हाके, प्रदेश युवती संयोजिका भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय मंत्री राज खैरनार आदी उपस्थित होते. 

https://www.facebook.com/508992935887325/videos/359312719178496

 


Protected Content

Play sound