यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बांधावरील वृक्ष विना परवाना तोडून धमकावणार्याच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शिवारातील शेतमालकाच्या परवानगी न घेता संमतीविना शेतातील बांधवरील तीन ओले जिवंत झाडे तोड करून पंचवीस हजार रुपयांचे नुकसान करीत शेतमालकास शिवीगाळ करीत धमकी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहीती अशी की ,यावल येथील राहणारे रवींद्र दगडू सोनार यांचे यावल शिवारातील शेत गट क्रमांक६६४ मध्ये शेतातील बांधावरील एक बाभूळ, एक निंब झाड होते.
यावल येथील रहिवासी पप्पू छोटू पटेल (राहणार विरार नगर) या इसमाने शेत मालकास न विचारता परस्पर २५ हजार रुपये किमतीची ओली जिवंत झाडे कापून शेतमालकाचे नुकसान केले. एवढेच नव्हे तर पुन्हा त्यांच्या यावल येथील दुकानात जावुन पप्पु पटेल याने संदीप रामदास गुरव आणी स्वप्नील रविन्द्र देवरे यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत शेतमालक रविन्द्र सोनार यांनी यावल पोलीस ठाण्यात पप्पु छोटू पटेल याच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोद करण्यात आली आहे. चोपडा यावल ,यावल फैजपुर व भुसावळ जाणार्या मुख्य मार्गाच्या कडेला दुर्तफा असलेली विस पंचाविस वर्षापासुनची जिवंत असलेली झांडाची कत्तल करण्यात येत आहे या वृक्षतोडीला कुणाची संमती आहे का या विषयाची देखील प्रशासकीय यंत्रेणे गांर्भियाने लक्ष देत चौकशी होवुन वनसंपत्तीचा होणारा विनाश थांबविण्यासाठी ही कार्यवाही होणे अत्यंत गरजे असल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांसह पर्यावरण व वृक्षप्रेमींकड्डन व्यक्त करण्यात येत आहे .