पाल ता. रावेर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | सालाबादप्रमाणे यंदाही पाल येथील वृंदावन धाममध्ये “गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असून याची जय्यत’ तयारीला देखील सुरूवात झाली आहे.
अखील भारतीय चैतन्य साधक परिवार तथा सातपुडयातील गोर गरीबाचे सद्गुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृन्दावम धाम पाल येथे सालाबादाप्रमाणे यंदा ही येत्या ३ जुलै रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी ला सुरुवात झालेली आहे.
परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांच्या स्मृति तसेच गुरु शिष्याचे अटूट बंधन असलेल्या अखील भारतीय चैतन्य साधक परिवार देशभरातून दरवर्षी लाखोंच्या संखेने येऊन गुरुपौर्णिमा श्री वृन्दावन धाम पाल आश्रमात साजरी करतात. पूज्य बापूजीच्या ब्रम्हलीना पच्यात या वृन्दावन धाम पाल आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सनिध्यात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार असून २ जुलै रोजी पाल आश्रमातून किमान दीडशे किलोमीटर वर असलेल्या मध्यप्रदेशतील चारुकेश्वर आश्रमातून हजारो भाविक पायी दिंडी घेऊन पाल आश्रमात येणार आहे. तसेच परिसरातून संत महंत महामंडलेश्वरांची उपस्थिती सुद्धा लाभणार असून या दोन दिवसीय गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकाच्या राहण्याची तसेच भोजन, सत्संग पंडाल व्यवस्थेची तयारी करण्यात येत आहे .त्याच प्रमाणे ,आरोग्य उपचार, पाल ग्राम स्वच्छ्ता, कायदा व सुव्यवस्था अबादित राहण्या करिता पोलिस , तसेच रावेर ते पाल व सावदा ते पाल येथून भाविकाना येण्याकरिता कुठलाही त्रास न व्हावा या साठी महामंडल जादा बस सेवा, आणि विज पुरवठा अखंडित राहण्याकरिता अश्या सर्व स्तरावरिल अधिकारी याना निवेदन देऊन विनंती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रशासनातर्फे अशी या गुरुपौर्णिमा महोत्सवाची पाल आश्रमासाठी सेवा पुरवण्यात यावी असे चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समितितर्फे निवेदनातून कळविण्यात येत आहे.