वीज बिल वसुली गेलेल्या पथकाला जमावाकडून मारहाण

खामगाव, प्रतिनीधी | खामगाव येथील वीज बिल वसुली गेलेल्या महावितरणाच्या पथकाला जमावाकडून मारहाण करण्यात करण्यात येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी धोबी खदान भागात घडली.

 

महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांना हल्ला करण्यात आल्याने विद्युत विभागाचे कर्मचारी शहर पोलीस स्टेशनमध्ये धडकले होते.  महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे आपल्या पथकासह शहरातील धोबी खदान परिसरात वीज बिल वसुली साठी गेले त्यावेळी काही जणांनी वीज बिल भरण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळी संबंधितांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम राबविण्यात येत असतानाच. धोबी खदान परिसरातील संतप्त जमावाने महावितरणच्या अधिकाऱ्यांचा पथकावर हल्ला चढविला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मारहाण केली. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे समजतात खामगाव महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी शहर पोलीस स्टेशनमध्ये धडकले. या प्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी धोबी खदान भागातील  जमापेकी भादवि कलम 143, 147, 149, 353, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content