खामगाव प्रतिनिधी । वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन आमदार अँड आकाश फुंडकर यांनी केले. आज भाजपातर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन वेळी ते बोलत होते.
लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीजबिले आली. सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे सांगितले आहे. महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपाने वीजबिलांच्या होळीचे आंदोलन केले.
लॉकडाऊनच्या काळात महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले दिली. हजारो शेतकऱ्यांनी वर्षभरापासून पैसे भरूनही अद्यापही वीज कनेक्शन दिले नाहीत. दोन दोन महिने जळलेल्या डीपी साठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वीज बिलात सवलत दिली नाही तर जिल्हा भरात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी आमदार अँड आकाश फुंडकर यांनी दिला .
या आंदोलनात सोशल मीडिया प्रदेश सह संयोजक सगर फुंडकर यांचेसह भाजप नेते रामचंद्र पाटील, नगराध्यक्ष सौ अनिता डवरे, जिल्हा सचिव संजय शिनगारे, शरदचंद्र गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, दिलीप पाटील, संजय शर्मा, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, किसान आघाडी तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे, शांताराम बोधे, जि प सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, संतोष टाले, न प आरोग्य सभापती राजेंद्र धानोकार, डॉ एकनाथ पाटील, प स सदस्य तुषार गावंडे, विलास काळे, राजेश तेलंग, भगावनसिंग सोळंके , विजय महाले, वैभव डवरे,विजय महाले, नागेंद्र रोहनकार, जितेंद्र पुरोहित, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, बळीराम लाहुडकार, संतोष घोराडे, त्रंबक बनकर, गजानन मुळीक, चेतन महाले, गोपाल बाठे, नितीन पोकळे, सुरेंद्र पुरोहित, केशव मेहेसरे, जितेंद्र मेहरा, दीपक सुलतान, संजय मोहिते, विकास हटकर, प्रतीक मुंडे, संतोष येवले, अमोल ठाकरे, संजय भागदेवानी, गोलू आळशी, अनंता शेळके, महादेव वाळके, यांचेसह पदाधिकारी , नागरिक उपस्थित होते.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे भोकरदन तालुक्यातील जाधव कुटुंबातील एकाच घरातील तिन्ही शेतकरी भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात पिकाला पाणी देत असताना विजेचा तार अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू होऊन संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. यावेळी महावितरणचा निषेध करीत तिन्ही शेतकरी भावंडांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली