यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकाचा विद्यूत पुरवठा खंडीत केल्याचा रागातून तरूणाने वायरमनला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. याबाबत तरूणावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या वीजबिलाची थकबाकी असलेल्या विजग्राहकांचे विद्यूत पुरवठा कनेक्शन तोडून खंडीत करण्याच्या सुचना देण्यात आले आहे. त्यानुसार यावल शहरातील प्रदीप संजय चौधरी (वय-२६) रा. मोरेवाडा, यावल यांच्याकडे विजबिलाचे थकबाकी होते. प्रदीप चौधरी यांनी वीजबिलाची थकबाकी असल्याने महावितरण कंपनीचे वायरमन महेंद्र सिताराम कुरकूरे यांनी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता प्रदीप चौधरी यांच्या घराचा वीजपुरवठा खंडीत केला. याचा राग आल्याने प्रदीप चौधरी याने वायरमन महेंद्र कुरकूरे यांना शिवीगाळ करून हुज्जत घातली. तसेच विज कर्मचाऱ्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी महेंद्र कूरकूरे यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून प्रदीप चौधरी याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्याला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.