विस्थापितांच्या मागण्यांसाठी लोकसंघर्ष करणार आंदोलन

भुसावळ प्रतिनिधी । महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विस्थापित होणार्‍या कुटुंबांच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाने आंदोलनचा इशारा दिला आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणात दीनदयाळ नगरमधील १०० घरे विस्थापित झाली आहेत. त्यासाठी जागा मौजे मिरगव्हाण येथील सरकारी जागा मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे ३१ मे २०१८ पासून प्रकरण प्रलंबित आहे. हा प्रश्‍न सोडवणे, राखेमुळे बाधित झालेल्या विल्हाळे गावाला सीएसआरमधून निधी, वेल्हाळे गावाचा वनहक्क दावा मंजूर करुन विनाअट राखेची निविदा देणे, रेल्वे अ‍ॅप्रेंटिस झालेल्यांना नोकरी व त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणे या मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आंदोलन करणार आहे. त्यात १९ जानेवारीस सकाळी १० वाजता नाहाटा चौफुलीवर रास्तारोको, तर २६ जानेवारीला शर्ट न घालता शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचा निर्धार लोकसंघर्ष मोर्चाने केला आहे. याबाबतची माहिती लोकसंघर्षचे दीपक काठे, राजकुमार ठाकूर, चंद्रकांत चौधरी आदींनी दिली आहे.

Add Comment

Protected Content