फैजपूर, प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मौजे वढोदा येथील श्री गुरू जगन्नाथ महाराज गोशाळेत जळगाव शहराचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक विष्णुभाऊ भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त फैजपूर येथिल विष्णू भंगाळे मित्रपरिवारातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.
विष्णू भंगाळे मित्रपरिवा फ़ैजपूरतर्फे श्री गुरू जगन्नाथ महाराज गोशाळेत गोमातेची पूजा व अर्चना तसेच गोमातेची आरती सेवा करून गाईंना व्हिटॅमिन सायरपचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महामंडलेश्वर श्री.जनार्दनजी स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी योगेश भावसार,राजेश महाजन, संदीप पाटील, अमोल चौधरी (फैजपूर), विवेक भंगाळे (चिनावल) व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.