जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात कापसाला फवारणी करताना विषबाधा झालेल्या धामणगाव येथील तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत बुधवार 12 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
अशोक ज्ञानेश्वर सपकाळे वय 35 राहणार धामणगाव तालुका जिल्हा जळगाव असे मत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक सपकाळे हा आई-वडील, पत्नी व दोन मुलं यांच्यासह धामणगाव येथे वास्तव्याला होता. शेती करून आपला परिवाराचा उदनिर्वाह चालवीत होता. त्यांच्या धामणगाव शिवारातील शेतात यंदा त्यांनी कापसाची लागवड केली होती. बुधवार १२ ऑक्टोबर रोजी दुपारी कापसाला औषध फवारणीचे काम सुरू होते. त्यावेळी अशोक सपकाळे याला फवारणी करताना विषबाधा झाली आणि त्याला अत्यवस्थ वाटायला लागले त्याला त्याच्या आई व पत्नी यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान अशोकचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात पृथ्वीची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई लताबाई, पत्नी सुनंदा, मुलगी भूमिका, मुलगा वैभव, आणि महेंद्र व किशोर हे दोन भाऊ असा परिवार आहे.