विश्व हिंदू परिषदेतर्फे काश्मीरमधील हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेध (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | येथे विश्व हिंदू परिषदतर्फे काश्मीरमधील हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेध करत जिहादींंचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून राष्ट्रपतीना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदने देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, काश्मीर घाटीत गेल्या ५ दिवसात सात भारतीयांच्या केल्या गेलेल्या हत्या व नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत आज केंद्र सरकारकडे या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की जिहादी आतंकवादाचा पूर्णतया विनाश करण्याकरिता पाकिस्तानला न भूतो न भविष्यती असे उत्तर द्यावे. तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित  करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित  करावी. हिंदूंच्या काश्मीर घाटीतील पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे. हिंदूंच्या सातत्याने निवडून निवडून होणाऱ्या नृशंस हत्यांमुळे आहत झालेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आज दिनांक ९ आँक्टोबर रोजी देशभरात जिहादी आतंकवादाविरुद्ध तीव्र प्रदर्शन करण्यात आले. भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या , भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्यात. हे निवेदन राष्ट्रपती योगेश्वर गर्ग, श्रीरंग राजे, देवेंद्र भावसार, श्रीराम बारी, दीपक जोशी, राहुल जोशी, दीपक दाभाडे, हरिभाऊ कोल्हे, उमेश सोनवणे, बापू माळी, राजूभाऊ ज्ञानी, दिनेश महाजन, कैलास जोशी, ज्ञानेश्वर कोळी आदी उपस्थित होते.

 

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/407907744166572

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2045362615618933

Protected Content