फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी नजीक असणाऱ्या कबनुर येथील सुतार गल्ली येथील विश्वकर्मा समाजाचे विश्वकर्मा समाज मंदीराची गंभीर मोडतोड व दहशत निर्माण करणाऱ्यावर कारवाई होणेबाबत विश्वकर्मा सुतार व लोहार सर्व समाज बांधवांतर्फे उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विश्वकर्मा मंदीराची तोडफोड 23 जुलै 22 रोजी राञी 1.30 च्या सुमारास केल्याची घटना घडली आहे.
प्रचंड नुकसान केले आहे. या लोकांवर स्थानिक पोलिस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला आहे. विश्वकर्मा समाजमंदिर ही आमच्या समाजाची अस्मिता आहे. याचे पडसाद पुर्ण महाराष्ट्र भर उमठु शकतात. सदर लोकांनवर तक्रार केली म्हणून व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. कबनुर व इचलकरंजी येथील आमच्या समाजबांधवाच्या जीवितास धोका आहे.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीवर कडक कारवाई लवकरात लवकर व्हावी अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल. आपल्या कडून आमच्या समाजाला न्याय अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
निवेदन देतांना अमोल निबाळे, रवींद्र रामदास मिस्तरी, राजेंद्र विसावे, चंद्रकांत जाधव, संतोष निंमगळे, राजेंद्र मिस्तरी, जितेंद्र मिस्तरी, गोपाळ जाधव, विजय मिस्तरी, विलास वाघोदेकर, दामोदर मिस्तरी, प्रकाश मिस्तरी, मिलिंद मिस्तरी, चेतन ठाकरे, निलेश निबाळे, भूषण गोपाळ जाधव, कल्पेश निबाळे, प्रसाद चिते व सर्व समाज बांधव उपस्थित होते.