रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील विश्राम जिंसी गावाच्या शिवारात ३ ते ४ दिवसापूर्वी भगवान महाजन यांच्या शेताच्या नाल्यामध्ये कुजलेले अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे. याची खबर पोलीस पाटील गोकुळ प्रताप पाटील यांनी पोलिसांत दिली आहे.
थोडक्यात हकीकत, विश्राम जिंसी येथे आढळलेल्या मृतदेहाचे वर्णन पुढील प्रमाणे, अनोळखी पुरुष वय सुमारे ३७ ते ४० वर्ष असून बांधा-मध्यम , रंग-सावळा, उंची- १६५ सेंटी मीटर, केस-काळे व २ ते ३ इंच लांबीचे, अंगात काथ्या कलरचा फुलबाईचा शर्ट त्यावर पांढऱ्या रंगाच्या लायनिंग ग्रे रंगाची फ़ुलपॅन्ट, निळे रंगाची अंबर कंपनीची निकर, डावे दंडावर उडते हनुमानजीचे गोंदलेले छायाचित्र व लालसिंग असे नाव गोंदलेले आहे. एक टायगर कंपनीचा डावे पायाचा बूट ८ नंबरचा पिवळसर व टोकावर काळसर बूट,अश्या वर्णनाच्या इसमाची बेवारस डेथ बॉडी मिळाली आहे अद्याप ओळख पटली नाही. घटनास्थळी डॉग स्कॉड(जंजिर डॉग) बोलाविण्यात आला होता. तसेच फॉरेन्सिक लॅब वाहन घटनास्थळी आले होते. निश्चित मरणाचे कारण समजून आले नसून मृतकाचे व्हिसेरा, डीएनए सॅम्पल काढण्यात आले आहे. संशयास्पद वस्तू वगैरे घटनाथळी मिळून आली नाही, नातेवाईकांनी रावेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळी डीवायएसपी पिंगळे, पो. नि. रामदास वाकोडे यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पीएसआय वाघमारे हे करत आहेत.