जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागातर्फे जळगाव जिल्हयासाठी सहाय्यक सरकारी वकील अॅड. चारुलता राजेंद्र बोरसे यांची विशेष सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या गुन्हयांचे प्रमाण लक्षात घेता लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ कायदयांतर्गत चालविण्यात येणा-या खटल्यांसाठी प्रत्येक जिल्हयासाठी जलदगती विशेष न्यायालयाची स्थापन करण्यात आलेली असून ना. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे.
ॲड.चारुलता बोरसे हया नोव्हेंबर २०१५ पासून जिल्हा न्यायालय जळगांव येथे सहाय्यक सरकारी वकील या पदावर कार्यरत असून या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकारचे खटले चालवून ब-याच खटल्यांमध्ये न्यायालयाने आरोपींना कठोर स्वरुपाची शिक्षा ठोठावलेली आहे व त्यामाध्यमातून त्यांनी समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे मोलाचे असे कार्य केले. त्यांनी सरकारी वकील म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाची दखल घेवूनच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या न्यायालयीन कामकाजाची पावती म्हणून त्यांची विशेष सरकारी वकील पदावर नियुक्ती केलेली आहे.