जळगाव,प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथामिक शाळा येथे दोन दिवशीय नर्सरी ते दहावीपर्यंतच्या पालकसभा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या. पालकसभेला संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील, निवासी विभागातील शालेय समिती प्रमुख प्रदिप जंगले , मुख्याध्यापक हेमराज पाटील उपस्थित होते.
शुक्रवार दि. १७ व शनिवार दि. १८ रोजी ऑफलाईन पद्धतीने पालकसभा आयोजित करण्यात आली होती. यात नर्सरी, ज्युनि केजी व सिनि केजी चे पालक उपस्थित होते. सुरवातीस उपस्थित पालकांचे स्वागत करुन त्या विषयीची प्रास्ताविक करण्यात आले. यावेळी विद्यार्थां बरोबर शिक्षक घडत असतात हे सांगून विद्या जोशी दिदी बालकांसाठी वेगवेगळ्या सण समारंभ कलर डे यांची माहिती देणारे गीत लेखन करत आहे याचे पालकांकडून कौतुक करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित पालकांनी ह्यावेळी आठवड्यातुन एकदा योगासन वर्ग सुरू करावा असे सुचविण्यात आले. त्यावेळी शाळेत आठवड्यातून एकदा त्याविषयी मार्गदर्शन करयात येईल असे मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी सांगितले .यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील यांनी बालकांचा आहार व पालकांच्या आदर्शकृती याविषयी मार्गदर्शन केले. प्राथमिक व माध्यमिक पालकसभेच्या सुरुवातीला शाळेत राबवले गेलेले उपक्रम, स्पर्धा, अभ्यासा संदर्भातील अॅक्टीव्हीटी या बाबतची माहिती दिपाली कापडणे दीदींनी दिली. पालकांनी शाळेत राबवले जाणारे उपक्रम तसेच डिसेंबर महिन्यात राबवला जात असलेला पौष्टीक आहार उपक्रम याविषयी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच पालकांच्या समस्याचे निरसन शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी केले. प्रदीप जंगले यांनी अतिशय छान पद्धतीने पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेबरोबर पालकही तेवढाच महत्चाचा घटक आहे हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे देवून पालकांचे समर्थन केले. पालक सभेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील व समन्वयिका जयश्री वंडोळे दीदी, वैशाली पाटील यांचे मागदर्शन लाभले . तसेच पालक सभा प्रमुख सचिन गायकवाड यांनी नियोजन केले . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.