जळगाव प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात ढोलताशांच्या गजरात श्रीगणपती बाप्पाचे आगमन झाले.
विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात विधीवत श्रीगणेशाची स्थापना निवासी प्रमुख शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. श्रीगणेशाची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मुलांनी लेझीम खेळत आणली. श्रीगणेश मूर्तीची स्थापना व विधीवत विवेकानंद प्रतिष्ठानचे ऊपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र सुरवाडे व सौ. ऊज्जवला सुरवाडे दिदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी पौरहित्य मधुसुदन जोशी यांनी केले. प्रमुख पाहुणे अध्यक्ष विवेकानंद प्रतिष्ठान इग्लिश मिडीयम स्कुलचे शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे सहसचिव विनोद पाटील, निवासी विभागाचे अध्यक्ष प्रदीपकुमार जंगले, मुख्याध्यापक जगदिश चौधरी, निवासी प्रमुख शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, पालक गणेश पाटील मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण पुरक टाकाऊ नारळाच्या शेंड्यापासून मोठे नारळ तयार करण्यात आलेले आहे. आकर्षक देखावा तयार केला आहेत.नारळात गणपती बसविला आहे. संतोष जोशी, संजय आंबोदकर, संजय कानडे, गोपाळ कुरकुरे, विवेक फेगडे, राधेशाम पाटील, भानुदास पाटील यांनी गणपतीची भजने गायली. झुम अॅपवर पालकांना गणेश स्पापनेचा कार्यक्रम दाखविला. कार्यक्रमास सर्व शिक्षक व सेवक बंधु ऊपस्थीत होते. सर्वत्र भक्तीमय आनंददायी वातावरण निर्माण झाले.