विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने करावीत — मंगला पाटील

 

 

जळगाव : प्रतिनिधी । राष्ट्रवादीमध्ये कोणतेही गटबाजीचे राजकारण नाही असे स्पष्ट करीत आज  महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करताना  शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर आठवडाभर विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली पाहिजेत अशी भूमिका घेतली

 

मंगला पाटील पुढे म्हणाल्या की , विनोद देशमुख हे पक्ष स्थापनेपासून पक्षात आहेत. कुणाकडूनही चुका होऊ शकतात त्यांच्याकडून काही चुका झाला होत्या. त्या आमच्या नेत्यांनी माफ करून आज त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला आहे. संघटना वाढविण्यासाठी आम्हाला एकएका  कार्यकर्त्यांची गरज आहे. आगामी महापालिका लढविण्यासाठी महिला, युवक यांची मदत घेतली जाईल. मागील निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने पक्ष संघटन मजबूत करून महापालिकेत जादुई आकडा आणण्याचा आमचा प्रयत्न  आहे. राष्ट्रवादीत गटातटाचे राजकारण नसल्याचा दावा करत नजरचुकीने बॅनरवर  नाव राहिल्याचे त्यांनी मान्य  केले  खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस पक्षाने साजरा केल्यानंतर अभिषेक पाटील , कल्पना पाटील यांनी दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता हे कसे झाले त्याबद्दल मला काही माहित नाही  असेही त्या म्हणाल्या

 

Protected Content