जळगाव प्रतिनिधी । आता विवाह सोहळ्यात साऊंड सिस्टीमसह डीजेला परवानगी देण्यात आली आहे.
साऊंड सिस्टीम, डिस्क जॉकी या व्यवसायाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परवानगी दिली आहे. यासाठी नियम लागू करण्यात आले असून यात ३० ते ४० नागरिकांच्या उपस्थितीत वाद्य वाजवण्यासह ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक काही नियमही लागू केले आहे. वाद्य वाजवण्यासाठी शासनाच्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहे. हे व्यवसाय सुरू करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश गवळी, उपाध्यक्ष संदीप धांडे, भागवत पाटील, सागर सोनार, दिनेश वंजाळे, कैलास महाजन यांनी पाठपुरावा केला आहे. यामुळे आता साऊंड व डीजे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.