रावेर प्रतिनिधी । शहरातील एका ३० वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील उटखेडा येथे घडली. याप्रकरणी तरूणाला रावेर पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गौरखेडा येथील ३० वर्षीय विवाहिता ही आपल्या पतीसह राहते. दरम्यान गावाच्या शेजारी असलेलया प्रमोद शामराव पाटील रा. उटखेडा ता.रावेर यांच्यात किरकोळ वाद झाला होता. याबाबत रावेर पोलीसांत तक्रार दिली होती. याचा राग प्रमोद पाटील याला आल्याने त्याने विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहे.