जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी येथील माहेर असलेल्या विवाहीतेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या 6 जणांविरोधात बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील खेड येथील माहेर असलेल्या रेश्मा दोडे वय 23 यांचा विवाह गुजरात मधील सुरत येथील गोरख ज्ञानेश्वर दोडे यांच्याशी झाला आहे. रेश्मा हिने तिच्या माहेरून दहा हजार रुपये रोख तसेच एक तोळ्याची अंगठी व तीन तोळ्याची सोन्याची चैन असे दागिने आणावेत या कारणावरून रेश्मा हीचा तिचे पतीसह सासरच्या मंडळींनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. यात छळाला कंटाळून रेश्मा ह्या जळगाव तालुक्यातील खेडी येथे माहेरी निघून आल्या. व त्यांनी या प्रकाराबाबत बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून रेश्मा हीचा तिचे पती गोरख ज्ञानेश्वर दोडे, ज्ञानेश्वर दोडे, सरुबाई दोडे, मुकेश दोडे, संगीता बागुल व विकास बागुल सर्व रा. सुरत,गुजरात या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील सोनार हे करीत आहेत