फैजपूर प्रतिनिधी । कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित ७५ वर्षीय आजी व २२ वर्षीय नातू यांचा अहवाल आज निगेटीव्ह आल्याने आजीसह नातवाला आज घरी सोडण्यात आले. गावकऱ्यांसह कुटुंबियांनी त्याचे स्वागत केले. आपण सुखरूप घरी पोहचल्याने आरोग्य विभागाचे आभार मानलेत.
येथून जवळ असलेल्या विवरे येथील ७५ वर्षीय आजी व २२ वर्षीय नातू यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघांना फैजपूर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह झाल्याचे प्राप्त झाल्याने दोघांना आरोग्य विभागाने घरी सोडले. गावात आल्यानंतर गावातील गावकऱ्यांसह कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले. कोरोना झाला म्हणून घाबरून जावू नका, इच्छाशक्तिच्या जोरावर आपण कोरोनावर मात करू शकतो. लक्षणे दिसताचा तातडीने रूग्णालयात जावून तपासणी करून घ्या, अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या आजी यांनी दिल्यात .