विलास पाटील यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्कार जाहीर

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा परिषद केंद्रशाळा कुऱ्हाड खु” ता. पाचोरा येथे कार्यरत असलेले गुणवंत शिक्षक विलास भास्कर पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रोटान शिक्षक संघटनेकडून राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्कार घोषित केला आहे.

या पुरस्काराचे वितरण ५ डिसेंबर रविवारी जळगाव येथील अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

विलास पाटील यांचे राष्ट्रीय ओ.बी.सी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, प्रोटान संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मुबारक शहा, पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, केंद्रप्रमुख राजू पटेल, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील, मुख्याध्यापक सुरेखा वेळे, सहकारी शिक्षक व मित्रपरिवार यांच्याकडून विलास पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Protected Content