जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी जलसंपदा मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांची कन्या श्रेया हिच्या विवाह समारंभासाठी विरोधी पक्ष नेत्यांसह अन्य केंद्रीय मंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस हे विशेष विमानाने पुणे येथून सायंकाळी ४:४५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन व लगेचच जामनेर कडे रवाना, त्यानंतर ६ वाजेपर्यंत जामनेर येथे राखीव, ७ वाजता विवाह समारंभास उपस्थिती व रात्री ९.२५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन व त्यानंतर विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सकाळी १०:३० वाजता विशेष विमानाने जळगाव विमानतळावर आगमन पोहचून ११.४५ वाजता जामनेर आणि हिवरखेडा येथे विवाह समारंभास उपस्थिती १२.१५ वाजता जळगाव विमानतळाकडे रवाना, तर १.१५ विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील दुपारी ४ वाजेस औरंगाबाद विमानतळावरून विशेष वाहनाने जामनेरकडे रवाना, पावणे सात वाजेस जामनेर पोहचून सव्वा आठ वाजेपर्यंत विवाह कार्यक्रमास उपस्थिती तेथून जामनेर कडे रवाना व ८:५० वाजेपर्यंत जळगाव विमानतळावर आगमन व त्यानंतर ९ वाजता विशेष विमानाने मुंबईकडे रवाना असे विविध मंत्र्यांचा जिल्हा दौरा आहे.