विरावली ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचपदाचा गौरवापर; गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांच्या घरासमोर अतिक्रमण केले आहे. तर उपसरपंच यांचे तीन अपत्य असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य ॲड. देवकांत पाटील यांनी यावल गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सन २०२०-२१ मध्ये ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेले तालुक्यातील विरावली येथील सरपंच कलीमा फिरोज तडवी, उपसरपंच मनिषा विश्वनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुषार सांडूसिंग पाटील, नथ्थू नामदेव अडकमोल आणि इब्राहिम दलशेर तडवी या सर्वांची घरे अतिक्रमित आहे. सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हे नेहमीच ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीला व इतर ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करत असतात. त्याचप्रमाणे उपसरपंच यांना २००५ नंतर तीन अपत्य व ग्रामपंचायत कामात हस्तक्षेप करत आहे. याची चौकशी करण्यात येवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, सरपंच, उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी, विरावली ग्रामपंचायत सदस्य देवकांन पाटील यांनी  प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

Protected Content