Home धर्म-समाज विरार येथील बुद्धाय श्रमजीवी फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा सन्मान

विरार येथील बुद्धाय श्रमजीवी फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्धांचा सन्मान

0
44

पाचोरा, प्रतिनिधी  ।  जीवाची पर्वा न करता अतुलनीय कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव मुंबईतील विरार येथे  बुद्धाय श्रमजीवी फाऊंडेशनने करण्यात आला.   

 

आरोग्य विभाग व पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अतुलनीय कामगिरी बजावली आहे, त्यांच्या या कार्याला सलाम करत विरार येथील बुद्धाय श्रमजीवी फाऊंडेशनने विरार (पुर्व) येथील पोलिस कर्मचारी, विरार (पश्चिम) येथील रेल्वे पोलिस कर्मचारी तसेच विरार (पश्चिम) येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणुन प्रमाणात पत्र देवुन सन्मान करत त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याचे काम केले आहे. याप्रसंगी  रेल्वे वरिष्ठ निरीक्षक सचिन इंगवले, ग्रामीण रुग्णालय विरार (पश्चिम) चे डाॅ. एस. के. कुंडगीर व विरार (पु) चे इन्फेक्टर दिलीप शेख हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बुद्धाय श्रमजीवी फाऊंडेशनने आधारस्तंभ संतोष वेखंडे , फाऊंडेशनचे अध्यक्ष श्वावण घिवरे, डॉ. अरविंद पवार, डॉ. नविन गिरी, प्रविण धावडे, विश्वनाथ चौधरी, हर्षल किणी, किशोर किणी यांचीही उपस्थिती होती.


Protected Content

Play sound