Home Cities जळगाव विराज कावडिया यांची युवासेनेच्या विभागीय सचिवपदी निवड

विराज कावडिया यांची युवासेनेच्या विभागीय सचिवपदी निवड

0
36


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील विराज कावडिया यांची युवासेनेच्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय विभागीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

युवासेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे आणि सचिव वरूण सरदेसाई यांनी युवासेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात जळगाव येथील पदाधिकारी विराज कावडिया यांच्यावर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नगर या पाच जिल्ह्यांसाठी उत्तर महाराष्ट्र स्तरीय विभागीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विराज कावडिया यांनी युवाशक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगाव शहरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. तर युवासेनेच्या माध्यमातून देखील ते सक्रीय असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे. या नियुक्तीबद्दी त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound